जळगाव हादरले : भर रस्त्यावर मूक-बधीर तरुणीवर अत्याचार, दोघांनी केली मारहाण

डिसेंबर 7, 2022 10:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी एक मूक-बधीर तरुणीला रस्त्यावर अडविले. दोघांनी तिला मारहाण केली तर एकाने अत्याचार केला आहे. मेहुणबारे पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे जिल्हा हादरला असून नराधमांचा शोध सुरू झाला आहे.

crime 75 jpg webp

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या एका गावात दि.४ डिसेंबर रोजी रात्री ८ ते दि.५ डिसेंबरच्या पहाटे ५ पर्यंत एक निंदनीय आणि संतापजनक प्रकार घडला आहे. एक २५ वर्षीय मूक बधीर तरुणी रस्त्याने जात असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी तिला अडविले. दोघांनी तिला ओढाताण करीत डोळ्यावर मारहाण केली. तर एकाने तिच्यावर अत्याचार केला.

घटनेची माहिती समोर आल्यावर पीडितेला उपचारार्थ धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष शिक्षिकेसमोर इशाऱ्याने तिने सर्व प्रकार सांगितला. तसेच आरोपी समोर आल्यास त्यांना ओळखेल असे तिने सांगितले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now