महर्षी वाल्मिकी जयंतीस सरपंच व ग्रामसेवकांची गैरहजेरी, कोळीसमाज बांधवांत तीव्र नाराजी

ऑक्टोबर 9, 2022 12:45 PM

muktainagar news -जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । आद्यकवी महर्षी वाल्मिक जयंती तिथीप्रमाणे सगळीकडे साजरी होत असताना, मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथे सरपंच, ग्रामसेवक व काही ग्रामपंचायत सदस्य हजर नसल्याने येथील कोळीसमाज बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

jalgaon 2022 10 09T124315.942 jpg webp

आज सकाळी जयंती साजरी करण्याच्या उद्देशाने ग्राम पंचायत कार्यालयात जमलेल्या समाजबांधवांना सरपंच,ग्रामसेवक तसेच इतर सदस्य गैरहजर दिसुन आले. यामुळे बांधव संतप्त होत यावरुन फोनवरुन सरपंच यांना जाब विचारला असता सरपंच मीना कोळी व सरपंच यांचा भाऊ विनोद कोळी यांनी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. असा आरोप समाजबांधवांनी केला आहे. तसेच ग्रामसेवक सुनिल नवले यांचा फोन स्वीच ऑफ होता. प्रसंगी उपस्थित विजेंद्र कोळी,प्रशांत कोळी,महेंद्र कोळी,शंकर कोळी, विकास उन्हाळे,दिपक कोळी,राहुल कोळी,विकस कोळी,रविंद्र कोळी यांच्यासह कोळी बांधव उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories