⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । केसीई खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात, इंटरनल क्वालिटी अशुरन्स विभाग तर्फे २३ मे २०२२ ते २७ मे २०२२ या कालावधीत पाच दिवसीय ऑफिस ऑटोमेशन वर शिक्षकेतर कर्माचारांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये ऍडव्हान्स एक्सेल तसेच ऍडव्हान्स वर्ड विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

शिक्षकेतर कर्मचार्यानी बदलत्या काळात मायक्रोसॉफ्ट ऑफिस चा उपयोग करून ऑफिस चे कामे सुलभ होण्यासाठी कसा करावा याविषयी सांगण्यात आले. प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, उपप्राचार्य प्रा. संजय दहाड आणि इंटरनल क्वालिटी अशुरन्स विभागाच्या समन्वयक डॉ. प्रज्ञा विखार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रा. राहूल पाटील यांनी समन्वयक म्हणून काम बघितले. यामध्ये संस्थेतील २५ कर्मचार्यानी सहभाग नोंदविला. जळगाव येथील सॉफ्टएड कॉम्प्युटर्स मधील स्वप्नां भावसार, अजय पाटील आणि मिलिंद सूर्यवंशी यांनी प्रात्यक्षिकाव्दारे उपस्थिताना मार्गदर्शन केले.