घटस्फोट झालेल्या तरुणीने तापी नदीत उडी घेत संपवली जीवनयात्रा!

जुलै 27, 2022 12:02 PM

bhusaval news-जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । घटस्फोट झालेल्या तरुणीने तापी नदीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरातील राहुल नगरात काल मंगळवारी घडली. याबाबत भुसावळ शहर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

crime jpg webp

राधा ताराचंद निकम (वय.२०, रा.राहूल नगर, भुसावळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. राधा च्या भावांनी भुसावळ शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. राधा हिचा घटस्फोट झाला होता. त्या विवेशनातून तिने मंगळवारी रोजी तापी नदीत उडी घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत भुसावळ शहर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अंमलदार सय्यद करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now