⁠ 
सोमवार, मे 6, 2024

मुक्ताईनगरच्या दांपत्याने केले वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त फळे व बिस्किटे वाटप

muktainagar news जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । बीएससी अँग्री कल्चर कॉलेज कर्मचारी दापत्य भूषण बाविस्कर व दिपाली बाविस्कर यांनी वडिल स्व.विठ्ठल चेतराम बाविस्कर यांचे १७ वे पुण्यस्मरणानिमित्त येथील रुग्णालयातील रुग्णांना व बसस्थानकावरील अपंग, निराधार, वयस्कर, तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फळे व बिस्किटे वाटप केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती मुक्ताई नगर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राणे व कर्मचारी मुक्ताई नगर पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर , संतोष नागरे, मुक्ताई नगर तहसीलचे नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय सापधरे, शुभम तळेले तसेच B S C अँग्री कल्चर कॉलेजचे सहायक नियंत्रक संजय पाटील, विजय पाटील, अशोक पाटील, ठाकूर व इतर कर्मचारी तसेच आश्रम शाळेचे मुख्याध्यापक राजेश पाटील व कर्मचारी उपस्थित होते.