⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत काव्या पवार, मानस पाटील, डॉ. सचिन खोरखेडे यांची बाजी

राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत काव्या पवार, मानस पाटील, डॉ. सचिन खोरखेडे यांची बाजी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगांव लाईव्ह न्यूज | १८ सप्टेंबर २०२३ | गोदावरी संगीत महाविद्यालयतर्फे आयोजित गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेचे उदघाटन गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वर्षा पाटील यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आला यावेळी त्यांचे सोबत प्राचार्य पद्मजा नेवे, डॉ. महिमा मिश्रा, परीक्षक धुळे येथील वीणा कमलाकर, आसावरी विंचुरकर उपस्थित होते. तर सायंकाळी समारोप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजीस्ट) प्राचार्या पद्मजा नेवे, डॉ. महिमा मिश्रा यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांनी संगीतात रियाजाला महत्व असून यासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे असते असे सांगत संगीतामूळे मानवाला जगण्याची नवी उमेद मिळत असते. परीक्षकांनी लहान लहान पराभवातून माणूस शिकतो आणि मोठा होतो त्यामूळे या स्पर्धेत यश आले नाही तरी नाउमेद होउ नका आपल्या गाण्यातील चुका शोध कारण यातून नवीन कला निर्मीती होऊ शकेल, असे सांगत दर्जा काय असतो तो या स्पर्धेतून बघायला मिळाला असे सांगीतले तर डॉ. वैभव पाटील यांनी मोठा होत असतांना अनेकदा गायक कलाकारांचा हेवा वाटायचा पण आता मी मोठा झाल्यावर कळते की यासाठी परीश्रम, जिदद् व योग्य मार्गदर्शनाची गरज असते. कलाकारांसाठी गोदावरी संगीत महाविद्यालय हे खुले व्यासपीठ सूरु केल्यावर आपण सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद यावर ही यशस्वी वाटचाल सुरु राहील असे आश्वासन त्यांनी दिले.

एकूण ८० स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती. विजेते स्पर्धकांची नावे – २०२३ : बाल गटप्रथम क्रमांक काव्या शरद पवार, (जळगांव) (मी वायाच्या वेगाने आले) द्वितीय आराध्य भुषण खैरनार (जळगांव) (मन चिंब पावसाळी) तृतीय मीत रोहीत साळवे (जळगांव) (मला न कळते सारेगम)उत्तेजनार्थ स्वरा आनंद जगताप (जळगांव) (कोणास ठाउक कसा)उत्तेजनार्थ गीत रोहीत साळवे (जळगांव) (नाविका रे वारा वाहेरे)किशोर गटात प्रथम क्रमांक मानस गोपाळ पाटील (वरणगांव) (दिवस तुझे हे फुलायचे) द्वितीय नंदिनी किशोर शिंदे (जळगांव) (फुलले रे क्षण माझे) तृतीय समर्थ पुरषोत्तम पाटील (जळगांव) (गारवा) उत्तेजनार्थ ऋतुराज सतिष जोशी (जळगांव) (आताच अमृताची) यांनी बाजी मारली.

तर उत्तेजनार्थ पियुषा नागेश नेवे ( जळगांव) (केव्हा तरी पहाटे ) प्रौढ गटात प्रथम क्रमांक डॉ. सचिन संतोष खोरखेडे (औरंगाबाद) (सजल नयन)द्वितीय वर्षा मंगेश कुळकर्णी (जळगांव) (रसिका मी कैसे गाउ) तृतीय नाजनिन शेख (जळगांव) (सावनात घना निळा बरसलां) उत्तेजनार्थ धनश्री दिनेश जोशी (जळगांव) (मी राधिका )उत्तेजनार्थ प्रणव विनोद ईखे (जळगांव) (तुला पाहिले रे) यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महिमा मिश्रा, तर सुत्रसंचालन निकीता जोशी, प्रियंका महाजन, किरण सोनी यांनी केले. स्पर्धेची साथसंगात संवादिनी वर सुशिल महाजन, भुषण खैरनार, तर तबला प्रविण महाजन, देवेद गुरव यांनी केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र व्यवस्थापक राजु पाटील, अनंता साठे, किशोर चौधरी, यांनी परिश्रम घेतले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह