मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू ; जळगाव शहरातील घटना

जून 2, 2025 9:18 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२५ । जळगाव शहरातील समता नगर नागेश्वर कॉलनी परिसरात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड (वय ४) असं मयत बालकाचे नाव आहे.

arvind gayakvad

अरविंद हा बालक नागेश्वर कॉलनीत आई-वडिलांसोबत राहत होता. जवळच असलेल्या सैनिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ज्युनियर केजीत तो शिकत होता. रविवारी सुट्टी असल्याने तो अंगणात खेळत होता. याच दरम्यान या बालकावर अचानक रित्या कुत्र्याने हल्ला चढविला.

हल्ल्यात कुत्र्याने त्याच्या चेहऱ्यावर, मानेवर व गळ्यावर जोरदार चावा घेतल्याने खोलवर जखमा झाल्या. जागोजागी लचके तोडल्याने बालक रक्ताच्या थारोळ्यात पडला. जखमी बॉबी किंचाळत असल्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याच भागातील आणखी १४ जणांचे या कुत्र्याने लचके तोडले आहेत.

दरम्यान, बालकाचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी मनपा प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त करत मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment