खुशखबर! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’चा मार्ग निश्चित ; जळगावकरांना होणार फायदा?

जून 3, 2025 2:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२५ । अलीकडेच प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरु केली. देशातील विविध मार्गावर ही ट्रेन धावत असून या ट्रेनला प्रवाशांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता यातच वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे. मात्र ती कधी आणि कोणत्या मार्गावर धावेल याबाबतची उत्सुकता होती. मात्र आता देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन उत्तर प्रदेशातून सुरू होणार असून या वंदे भारत स्लीपरचा मार्ग देखील निश्चित झाला आहे.

vande bharat sleeper

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही लखनऊ ते मुंबई अशी चालवली जाणार आहे. याआधी पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन वाराणसी ते दिल्लीदरम्यान सुरू करण्यात आली होती. विशेष लखनऊ ते मुंबई दरम्यान धावणारी स्लीपर वंदे भारत ट्रेन ही भुसावळ, जळगाव मार्गे धावण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन स्लीपर वंदे भारतचा संपूर्ण रॅक दिल्ली कोचिंग यार्डमध्ये पोहोचला आहे. त्यानंतर, रेल्वे ही ट्रेन चालवण्यास सुरुवात करण्याची योजना आखत आहे. खरंतर लखनऊ ते मुंबई मार्गावर सर्वाधिक रेल्वे प्रवासी असल्यामुळे रेल्वेने या मार्गावर वंदे भारत स्लीपर सुरू करण्याचा विचार केला.यासाठी फक्त रेल्वे बोर्डाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहिली जात आहे. बोर्डाकडून परवानगी मिळाल्यानंतर या ट्रेनचा मार्ग आणि वेळापत्रक जारी केले जाईल. जुलै महिन्यात या ट्रेनच्या ट्रायलची शक्यता आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून या मार्गाचा सर्व्हे सुरु होता. सुरुवातीला कानपूर, मथुरा, आग्रा मार्गाने मुंबईला जाण्याचा प्रस्ताव होता. त्यानंतर बरेलीहून आंवला, चंदौसी, मुरादाबाद, गाझियाबाद, निजामुद्दीन मार्गाने आग्रा आणि त्यानंतर मुंबईला जाण्याचा मार्ग निश्चित करण्यात आला. तोही बदलला. शेवटी लखनऊहून हरदोई, शाहजहांपूर, बरेली जंक्शन, रामपूर, मुरादाबाद, गाझियाबाद, निजामुद्दीन, आग्रा या मार्गाने मुंबईला जाणारा मार्ग ठरला.

विशेष वंदे भारत स्लीपर ट्रेन ही भुसावळमार्गे धावण्याची शक्यता आहे. कारण लखनऊ-मुंबई मार्गावरील बहुतांश गाड्या या भुसावळ मार्गच धावतात. त्यामुळे वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील भुसावळ मार्गे धावण्याची शक्यता आहे. तिला जळगावला थांबा असण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्यापही रेल्वेकडून कोणतीही घोषणा झाली नसून लवकरच या ट्रेनचे वेळापत्रक जारी होईल

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकूण २० कोच असतील. यामध्ये एसी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्लास व्यतिरिक्त दोन एसएलआर कोचही असतील. या ट्रेनची १२०० प्रवाशांची क्षमता असेल. या ट्रेनमुळे लखनऊ-मुंबईचा प्रवास १० तासांत पूर्ण होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment