फाटलेल्या नोटांबाबत RBIचा मोठा निर्णय ; आता ‘या’ कामात केला जाणार वापर?

जून 3, 2025 1:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अलिकडेच, रिझर्व्ह बँकेने जुन्या नोटांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आरबीआयने आता जुन्या आणि फाटलेल्या नोटा जाळण्याऐवजी किंवा वितळवण्याऐवजी त्याचा काही चांगल्या कामांसाठी वापर केला जाणार आहे. यासाठी आरबीआय नवीन योजना आखत आहे.

Rbi guidelines for taking torn notes

आरबीआयने वार्षिक अहवालात म्हटलंय की, या नोटांचा वापर पार्टिकल बोर्ड बनवण्यासाठी केला जाईल. ज्यापासून खुर्च्या, टेबल आणि इतर फर्निचर बनवू शकतात. दरवर्षी, रिझर्व्ह बँकेला १५,००० टनांहून अधिक जुन्या आणि फाटलेल्या नोटा मिळतात, ज्या चलनातून बाहेर काढल्या जातात.

पूर्वी, या नोटा जाळून किंवा कुजून नष्ट केल्या जात होत्या, जी एक महागडी आणि पर्यावरणाला हानिकारक प्रक्रिया होती. आता आरबीआय या नोटा नष्ट करण्यासाठी नवीन आणि चांगल्या पद्धती अवलंबत आहे.

आता काय बदल होईल?
आरबीआयने आता पार्टिकल बोर्ड बनवणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधला आहे. या योजनेअंतर्गत, रिझर्व्ह बँक या खराब झालेल्या नोटांचे बारीक तुकडे करून त्या या कंपन्यांना विकेल. यामुळे कंपन्यांना स्वस्त आणि शाश्वत कच्चा माल मिळेल, तर आरबीआयसाठी विनाशाचा खर्चही कमी होईल. या प्रक्रियेमुळे बँकेला अतिरिक्त उत्पन्न मिळेल.

पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर-
आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ने पर्यावरणाच्या हितासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता जुन्या नोटा जाळण्याऐवजी किंवा त्या लँडफिलमध्ये टाकण्याऐवजी, त्यांचा वापर पार्टिकल बोर्ड बनवण्यासाठी केला जाईल. हा निर्णय केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या लाकूड विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या अभ्यासावर आधारित आहे.

पार्टिकल बोर्ड म्हणजे काय?
पार्टिकल बोर्ड हे एक लाकूड आहे. जे लाकडाच्या शेव्हिंग्ज, भूसा, तंतूना गोंद किंवा रेझिनसह एकत्र बनवला जातो. यापासून तुमच्या घरातील फर्निचरदेखील बनवता येईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment