जळगावातील शिवकॉलनी चौकात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला भरधाव कंटेनरने चिरडले

जून 1, 2025 5:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज १ जून २०२५ । जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आणखी एकाचा बळी गेला आहे. रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात कंटेनरने धडक दिली. त्यात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज १ जून रोजी शहरातील शिवकॉलनी चौकात घडली. विशाल रमेश सोनार (वय-४४) असं मयत व्यक्तीचे नाव असून या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

acd 1june

या घटनेबाबत असे की, धरणगाव तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेले विशाल सोनार हे जळगाव शहरातील शिव कॉलनीमध्ये वास्तव्यास असून ते आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवकॉलनी चौकात रस्ता ओलांडत असताना खोटेनगरकडून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली.

धडक इतकी जबरदस्त होती की, त्यात त्यांच्या चेंदामेंदा झाला. घटनेनंतर कंटेनर चालक न थांबता घटनास्थळावरून पसार झाला.मयत विशाल सोनार यांच्या खिशात त्यांचे ओळखपत्र आढळून आले. त्यावरून ते महसूल विभागात शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ मृतदेहाचा पंचनामा केला आणि एका खाजगी वाहनातून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत विशाल सोनार यांच्या नातेवाईकांनी देखील रुग्णालयात धाव घेतली असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीसांकडून फरार कंटेनरचालकाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment