जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२५ । अमळनेर तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मयूर ऊर्फ हरीश बाळू पाटील (१२) आणि चेतन धनराज पवार (९) असं मयत मुलांची नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चेतनचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता.

चेतनची आई माहेरी कुरवेल (ता. चोपडा) येथे बहिणीला घेण्यासाठी गेली होती. घरी फक्त वृद्ध आजी आजोबा होते. तर हरीश पाटील यांच्या वडिलांचे पानाचे दुकान आहे. सोमवारी गावात लग्नासाठी आलेल्यांची गर्दी असल्यामुळे ते दुकानात होते. घरी कोणी नसल्याचा फायदा दोन्ही मुलांनी उचलला. ते कुणालाही न सांगता तापी नदीवर पोहायला गेले होते, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली.
तेथे त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाली. जवळ वाचवायला कुणीही नव्हते. त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यापैकी चेतनचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता. चेतन हा इयत्ता चौथीत तर हरीश हा इयत्ता सातवीत शिकत होता.