---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

सुरतच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जळगावातील हॉटेलमध्ये नेलं अन्.. पुढे घडलं धक्कादायक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । लग्नाचे आमिष दाखवून तरुणींसह महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. अशीच एक घटना जळगाव शहरातून समोर आलीय. ज्यात सुरत येथील ३५ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये आणून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील विनोद शिवराम कुसळकर (वय ३५) याच्यावर जळगाव शहर पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Untitled design 15 jpg webp webp

सुरत येथे नोकरी करणारी पीडित तरुणी आपल्या उपजीविकेसाठी तिथे वास्तव्य करत आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील रहिवासी विनोद कुसळकर याने १८ मे रोजी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजेदरम्यान तिला जळगाव रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

---Advertisement---

यासंदर्भात पीडितेने रविवार, दि. १ जून रोजी रात्री तक्रार दाखल केली असून, त्यानुसार विनोद कुसळकर याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

1 thought on “सुरतच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जळगावातील हॉटेलमध्ये नेलं अन्.. पुढे घडलं धक्कादायक”

  1. जळगाव व परिसरातील संपूर्ण माहिती एकदम व्यवस्थित व निष्पक्ष मिळत असल्याने मी update राहतो.व मला ह्याचा फार craze आहे.

Leave a Comment