जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२५ । या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमती वेगाने वाढत आहेत. २०२५ मध्ये सोन्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे, परंतु सोन्याने खरेदीदारांना घाम फुटला आहे. जानेवारी २०२५ पासून सोने १६ टक्के महाग झाले आहे (गोल्ड रेट), जे गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक वाढ दर्शवते. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर १ लाख रुपयांच्या पलीकडे गेले होते. त्यानंतर या दरात घसरण दिसून आली. सध्या सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमसाठी ९७,००० रुपयांवर आहे.

दरम्यान आगामी सणासुदीत खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर, सोन्यात मोठी घसरण होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोन्याची किंमत सुमारे १२,००० रुपयांनी घसरण होऊ शकते.

केडिया अॅडव्हायझरीजचे संचालक अजय सुरेश केडिया यांनी सांगितले की, सध्या सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होत असली तरी येत्या काळात सोन्याचे दर कमी होती. एप्रिल-मे महिन्यात सोन्यात १० टक्के सुधारणा दिसून आली. परंतु येत्या काळात सध्याच्या दरानुसार १२,००० रुपयांची घसरण दिसून येऊ शकते. सोने ८० ते ८५ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते.
सोन्याच्या किमतीवर जागतिक घडामोडींचा परिणाम होत असतात. जेव्हा जेव्हा जागतिक पातळीवर परिस्थिती तणावाची असते तेव्हा तेव्हा सोन्याच्या किमतीत वाढ दिसते. परंतु सध्या अमेरिकेकडून टॅरिफसंदर्भात भूमिका थोडी सौम्य करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी झाला आहे. यामुळे सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते.
आरबीआयची मॉनेटरी पॉलिसी सोन्याच्या दरात महत्वाची भूमिका बजावत असते. आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसीच्या समितीची बैठक सहा जून रोजी होत आहे. या बैठकीत आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होऊ शकतो. किंमतीत घसरण होऊ शकते.












