जळगाव लाईव्ह न्यूज| ७ ऑगस्ट २०२३। साताऱ्यातील वाई इथं भर कोर्टात न्यायाधीशांच्या दालनातच एका आरोपीवर गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांनुसार, वाई न्यायालय हा गोळीबार झाला असून मोक्काखाली कारवाई करण्यात आलेला कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईंज) याच्यासह निखिल व अभिजीत शिवाजी मोरे (रा गंगापुरी वाई) यांच्यावर गोळीबार झाला आहे. कोर्टात दबा धरुन बसलेल्या एका आरोपीनं हा गोळीबार केला आहे.
दरम्यान, बंटी जाधव हा कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात असताना त्यानं वाईमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाकडं खंडणीची मागितली होती. यामुळं वाई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी कळंबा कारागृहातून तीन जणांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
तसेच त्यांना आज वाई कोर्टात आणल्यानंतर कोर्टात दबा धरुन बसलेल्या एका आरोपीनं बंटी जाधवसह निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे या तिघांवर गोळीबार केला.
या आरोपींवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून एका आरोपीला पोलिसांना पकडण्यात यश आलं आहे. या थरारक घटनेत एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. हा सर्व प्रकार न्यायाधीशांच्या केबिनमध्ये त्यांच्यासमोरच घडली आहे, अशी माहिती सुत्रांनी पोलिसांच्या हवाल्यानं दिली आहे.