एकनाथ शिंदे यांची मी भेट घेतली तर खळबळ माजेल ! – खा संजय राऊत

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२३ । महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल? हे कोणीच सांगू शकत नाही. यातच नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. यावर खासदार संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे.

ते म्हणाले कि, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं म्हणजे खळबळ माजवणारं नाही.मी आणि एकनाथ शिंदेंना भेटलो तर खळबळ माजेल.

यावेळी राउत म्हणाले की, शरद पवार अनेक क्षेत्रात काम करतात. सहकार क्षेत्र, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्राशी संबंधित कामांसाठी कुणी मुख्यमंत्र्यांना भेटत असेल तर त्यामध्ये इतकी खळबळ माजण्याची गरज नाही. मी भेटलो तर खळबळ माजेल.

SANJAY RAUT AND EKANTH SHINDE TOGETHER jpg webp

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now