दुर्दैवी : अपघाती मृत्यूने हरपलं चार मुलांचं पितृछत्र

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२३ । बाजरीचा कट्टा घेऊन तरुण दुचाकीवरून घराकडे परतत होता. यावेळी झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तो पत्नी सुरेखा आणि चार मुलांसह वास्तव्याला होता

CRIME 15 jpg webp

प्रवासात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी झाडावर आदळली. आणि या अपघातात घरी पोहोचण्यापूर्वीच तरुणाचा दुर्देवी मृत्यूबी झाल. म्हसावद येथे योगेश गायकवाड हा तरुण पत्नी सुरेखा आणि चार मुलांसह वास्तव्याला होता. शेती व सेंट्रींगचे काम करून तो आपला उदरनिर्वाह भागवित होता.

योगेश हा बाजरीचा कट्टा घेण्यासाठी त्याच्या दुचाकीने एरंडोल शहरात गेला होता. बाजरीचा कट्टा घेतल्यानंतर सायंकाळी ७ वाजता योगेश पुन्हा म्हसावदला घराकडे परतत होता. नागदुली गावाजवळ योगेशचं दुचाकीवरील नियंत्रण अचानक सुटलं. यामुळे त्याची दुचाकी थेट रस्त्यालगतच्या कडुलिंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात योगेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने योगेशचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहे. बाजरी घेण्यासाठी सकाळी गेलेला पती योगेश हा सायंकाळ होवून घरी परतला नाही. यामुळे पत्नी सुरेखा ही योगेशची प्रतिक्षा करत होती. मात्र तिला योगेशचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. योगेशच्या या अपघाती मृत्यूने त्याच्या चार मुलांचं पितृछत्र हरपलं आहे. या घटनेने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now