मोठी बातमी : हार्दिक पंड्या असणार भारताचा टी-२० कॅप्टन

नोव्हेंबर 1, 2022 1:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२२ । बीसीसीआयच्या निवड समितीने न्यूझीलंड आणि बांग्लादेश सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा केली. यावेळी टी 20 वर्ल्ड कप संपल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. टी 20 टीमचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं आहे. या मालिकेवेळी भारताच्या दिग्गज खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना आराम देण्यात आला आहे.

hardik pandya jpg webp

हार्दिक पंड्याने मागच्या काही महिन्यात लीडर म्हणून स्वत:चा ठसा उमटवला असल्याने त्याला हि जवाबदारी देण्यात आली आहे. पंड्यामध्ये उत्तम नेतृत्वगुण दिसले असल्याने आणि अनेक कठीण सामन्यांमध्ये त्याने परिपक्वता दाखवली आहे. यामुळे त्याला कर्णधार करण्यात आले आहे. असे म्हणते जात आहे.

आयपीएलमध्ये त्याने गुजरात टायटन्सच नेतृत्व केलं. त्याच्या कॅप्टनशिपखाली पहिल्याच मोसमात टीमने जेतेपद मिळवलं. टीम इंडियाने आयर्लंड विरुद्धची मालिका 2-0 अशी जिंकली. टीमला तो पुढे घेऊन जाताना दिसलाय. पंड्याने मागच्या काही सीरीजमध्ये आपल्या कामगिरीतून उपयुक्तता सिद्ध केलीय. तो बॅट आणि बॉलने कमाल करतोय. आपल्या प्रदर्शनाने प्रभाव टाकण्याची क्षमता असलेल्या खेळाडूला कॅप्टन बनवलं जातं. पंड्यामध्ये हे गुण आहेत. म्हणूनच त्याला कर्णधार केले गेले आहे. असे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now