शिंदे सरकारला लवकरच ग्रहण लागणार

ऑक्टोबर 25, 2022 4:14 PM


जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । राज्यात सत्ता पालट झाल्या पासून शिंदे-फडणवीस सरकार विरूद्ध विरोधक असा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. त्यातच, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला लवकरच ग्रहण लागणार आहे, अशी भविष्यवाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

eknath shinde 8 jpg webp

महाराष्ट्राच्या शिंदे सरकारला लवकरच ग्रहण लागणार आहे. शिंदे गटातील आमदारांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्याकडून चूक झाली अशी त्यांची भावना होत चालली आहे. शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची स्वप्ने दाखवली गेली, पण ती पूर्ण झाली नाहीत. आपला डाव फसला अशा प्रकारची कबुली शिंदे गटातील आमदार मंडळी दबक्या आवाजात आपल्या मतदारसंघात देत आहेत,” असे यावेळी ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now