ऐन दिवाळीत एसटीचा प्रवास महागला ; भाडेवाढीनंतर वाचा जळगावहून जाणाऱ्या बसेसचे नवे दर

ऑक्टोबर 21, 2022 1:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । उद्यापासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. सोमवारी (२४ ऑक्टोबर) दिवाळी आहे. हा सण आपल्या मूळ गावी जात साजरा करण्याकडे बहुतांश नागरिकांचा कल असतो. या दरम्यान, विविध साधनाने लोक गावी जातात. एसटी बसमध्येही या काळात गर्दी ओसंडून वाहत असते. मात्र अशातच एसटी बस प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे.

bus st

एसटी महामंडळाने गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने एसटी प्रवासासाठी १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली ही भाडेवाड ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत कायम राहणार असून सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. या भाडेवाढीने लांब पल्ल्याचा प्रवासासाठी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

यात जळगावहून पुण्याला जाण्यासाठी 20 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून प्रवाशांना 605 ऐवजी 665 रुपये मोजावे लागणार आहे. तर जळगावहून पाचोऱ्यासाठी 80 वरून 85 रुपये भाडे लागणार आहे. एकंदरीत महामंडळाने विविध शहरांसाठी 5 रुपयांपासून ते 65 रुपयांपर्यंत भाडेवाढ केली आहे.

दरम्यान, ज्या प्रवाशांनी एसटी प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केलं आहे , त्या प्रवाशांकडून वाहकाद्वारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. तथापी, ही भाडेवाढ एस.टी.च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.

जळगावहून जाणाऱ्या बसेसचे दर
जळगाव – मुंबई – आधीचे दर.. 635, आताचे दर … 700
जळगाव – सुरत : आधीचे दर.. 425, आताचे दर … 600
जळगाव – औरंगाबाद : आधीचे दर.. 245, आताचे दर … 270
जळगाव – नाशिक : आधीचे दर.. 375, आताचे दर … 415
जळगाव – नंदुरबार : आधीचे दर.. 245, आताचे दर …310
जळगाव – धुळे : आधीचे दर..140, आताचे दर …155
जळगाव – चाळीसगाव : आधीचे दर…150, आताचे दर …​​​​​​​165
जळगाव – पाचोरा : आधीचे दर…80, आताचे दर …​​​​​​​85
जळगाव – शिरपूर ​​​​​​​ : आधीचे दर…165, आताचे दर …​​​​​​​ 185
जळगाव – पुणे : आधीचे दर…605, आताचे दर …​​​​​​​ 665

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now