दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर जळगावातील अनेक भागात पावसाची हजेरी

ऑक्टोबर 11, 2022 10:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | ११ ऑक्टोबर २०२२ | सध्या राज्यासह जळगाव जिह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. जळगावात गेल्या दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्याना दिलासा मिळाला होता. मात्र दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. आज मंगळवारी पहाटपासून जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. हवामान खात्याकडून आज संपूर्ण राज्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

rain jpg webp

राज्यासह जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात दसऱ्यापासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात ८ किंवा ९ ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस धडकणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. जो पूर्वीच्या अंदाजात ५ ऑक्टोबरला दाखल होणार होता. परंतु त्यापूर्वी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. आज संपूर्ण राज्यासह जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात दोन तीन दिवस जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळं काढणीला आलेलं सोयाबीन आणि वेचणीच्या तोंडावर असलेल्या कापूस पिकांचं मोठं नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी शेतात सोंगणी करुन ठेवलेले सोयाबीन पाण्यात सापडलं आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. 

जळगांव जिल्हा
भुसावळ-58.8
जामनेर 94
यावल-19
एरंडोल-35

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now