नाश्ता करायला हॉटेलात गेलेला तरुण अंगावर गरम तेल पडल्याने भाजला

ऑक्टोबर 7, 2022 10:42 AM

Yawal News । जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । यावल शहरातील भुसावळ टि-पॉइंट जवळील एका अल्पोहारच्या दुकानात नाश्ता करण्यास गेलेला २० वर्षीय तरुण अंगावर गरम तेल पडल्याने तरुण जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यास जळगावी हलवण्यात आले. चंद्रकांत बळीराम बाविस्कर असे जखमी तरुणाचे नाव आहे.

fire oil jpg webp

यावल तालुक्यातील वढोदे येथील चंद्रकांत बळीराम बाविस्कर वय-२० हा तरुण यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या एका अल्पोहाराच्या दुकानात नाश्ता करण्यासाठी गेला होते. तेथे गरम तेल अंगावर पडल्याने त्याच्या उजव्या बाजुने डोके व पाठ भाजली गेली. यावल ग्रामीण रुग्णालयात त्यास उपचाराकरीता दाखल केले असता डॉ.पवन जैन, अधिपरीचारीका मनिषा धांडे, संजय जेधे यांनी प्रथमोपचार केले व त्यास पुढील उपचारा करीता जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now