जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्हा सह संपूर्ण शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. लवकरच अनंत चतुर्दशी येत आहे. यामुळे आता बाप्पा हे आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहेत. मात्र दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात जळगाव शहरात ज्या प्रकारे गणेशोत्सव पार पडला. यामुळे बाप्पा वर मोठ्या प्रमाणावर फुलांचा वर्षाव झाला. पर्यायी फुल व्यवसायिक खुश दिसत आहेत.
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा 20 ते 30 टक्क्यांनी फुलांच्या दरात वाढ झाली होती. फुलांच्या दरात जरी वाढ झाली होती तरी यंदा मोठ्या प्रमाणावर गणेश भक्तांनी आपल्या घरात आपल्या मंडळांमध्ये फुलांची आरास केली होती. यामुळे फुल व्यवसायिक भलतेच खुश आहेत.
येत्या काही दिवसात अनंत चतुर्दशी जवळच आहे. त्या दिवशी त्यादिवशी गणेश भक्त मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतील. अशावेळी फुलांची उधळण होणारच. जळगाव शहरात गुलाल चा वापर होत नाही यामुळे गणेश भक्त मोठ्या प्रमाणावर फुलं विकत घेणार आहेत. काहींनी तर आधीपासूनच फुलांची ऑर्डर देऊन झाली आहे. यामुळे यावर्षी सर्व फुल व्यवसायिकांना गणपती बाप्पा चांगलाच पावला आहे. पूर्ण वर्ष असेच निर्विघ्नपणे पुढे जाऊ दे अशी प्रार्थना शहरातील फुल व्यवसायिक करत आहेत. येत्या काळात नवरात्र उत्सव देखील येत आहेत. यामुळे नवरात्र उत्सव देखील असा जोरात साजरा व्हावा अशी देवाचरणी प्रार्थना फुल व्यवसाय करत आहेत.
तर दुसरीकडे अनैसर्गिक फुलं म्हणजे जी प्लास्टिक आणि कागदापासून बनवली जातात त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर यंदा मागणी होती. कागदाची व प्लास्टिकची फुलं खराब होत नाहीत. जास्त दिवस टिकतात. या अनुषंगाने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या फुलांना पसंती दिली होती. यामुळे या फुलांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी यंदा पाहिला मिळाली. जळगाव शहरातील व्यवसायिकांच्या मते यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट व्यवसाय झाला आहे. यामुळे सर्वत्र आनंदाची लाट पाहायला मिळत आहे व बाप्पा दरवर्षी असाच पावला पाहिजे अशी प्रार्थना व्यवसायिक करत आहेत