झांबरे माध्यमिक विद्यालयात पुण्यतिथी व जयंती साजरा

ऑगस्ट 2, 2022 3:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । ‘लोकमान्य टिळक’ यांच्या पुण्यतिथी तसेच लोकशाहीर ‘अण्णाभाऊ साठे’ जयंती निमित्त ए. टी. झांबरे विद्यालयात वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.

jaynti

इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाची सुरुवात नेत्यांच्या प्रतिमेला शाळेच्या मुख्याध्यापिका पी.के. झांबरे यांनी पुष्पहार अर्पण केले. शाळेचे पर्यवेक्षक एन.बी.पालवे यांनी प्रतिमेचे पूजन केले शाळेच्या सहभागी विद्यार्थ्यांपैकी रिया पाटील, केतन पाटील, सहज फेगडे,साहिल महाले,भूमिका चौधरी तन्मय पाटील,अथर्व ब्रह्मक्षत्रिय या विद्यार्थ्यांनी नेत्यांच्या महानतेबद्दल आप आपले विचार प्रकट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पराग राणे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षा राणे ए.एन.पाटील ई.पी.पाचपांडे,सुचिता शिरसाठे,आर. एन. तडवी व एस.एल.भोळे यांनी प्रयत्न केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now