जळगावात एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; 80 किलो गोमांस जप्त, चौघे ताब्यात

ऑगस्ट 2, 2026 10:06 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर परिसरात अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांवर एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे 80 किलो गोमांसासह चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलीक धनके यांना जळगाव शहरातील पिरजादे वाडा, जामा मशिदीसमोरील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे गोमांसाची विक्री करत असल्याची गुप्त बातमी मिळाली. बातमीची खात्री पटल्यानंतर त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोन पंच आणि पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला.

या छाप्यात युसुफ खान इस्माईल खान (वय 52, रा. मेहरून), शफी शेख बाबुलाल कुरेशी (वय 52, रा. तांबापुरा), शेख मुख्तार शेख बिस्मिल्ला (वय 42, रा. तांबापुरा) आणि शेख रईस शेख मुनाफ (वय 40, रा. पाळधी, ता. धरणगाव) हे चौघे गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याचे आढळून आले.

तसेच कारवाईदरम्यान पोलिसांनी 80 किलो कच्चे गोमांस, सहा लोखंडी सुरे, एक कुऱ्हाड आणि एक वजनकाटा असा एकूण 16,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस अंमलदार अफजल रफियोद्दीन बागवान यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक CCTNS 636/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1976 मधील कलम 5(क) व 9(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार दीपक महाजन करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now