शासकिय योजनांसाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी शिबीर घ्या : अ‍ॅड. रोहीणी खडसे

जुलै 20, 2022 12:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । शासकिय योजनांसाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांचे तालुक्यात ठिकठिकाणी शिबिरे घेण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडे केली. दरम्यान, तहसीलदार श्वेता संचेती यांनी लवकरच मंडळ स्तरावर असे शिबीर घेण्यात येतील असे आश्वासन दिले.

tahasildar muktainager 1

विशेष अर्थसहाय्य योजनेतंर्गत असणाऱ्या संजय गांधी निराधार अर्थसाहाय्य योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यांच्या अंतर्गत समाजातील वृद्ध, अपंग, विधवा परितक्ता यांना दरमहा अनुदान देण्यात येते. या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी त्यांचा हयातीचा आणि नायब तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेला अत्यल्प उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो.

परंतु, या योजनांचे लाभार्थी अपंग, निराधार वृद्ध, व्यक्ती असतात त्यांना हे दाखले मिळवण्यासाठी तहसील कार्यालय मुक्ताईनगर येथे यावे लागते किंवा सिएससि सेंटर मार्फत काढावे लागत असून ही बाब गैरसोयीचे ठरते. त्यामुळे तालुक्यात मंडळ स्तरावर कुऱ्हा, अंतुर्ली, घोडसगाव येथे नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत विशेष शिबिर घेऊन लाभार्थ्यांना तात्काळ दाखले उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी डॉ. बि.सी.महाजन, तालुका सरचिटणीस रवींद्र दांडगे, बाळा भालशंकर, संजय कोळी, विशाल रोठे, सुनिल तलवारे, मयुर साठे, चेतन राजपुत, भूषण पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now