एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच साधला निशाणा : संतापुन विचारला ‘हा’ प्रश्न

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?#donttrickmaharashtra अशे खडे बोल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहेत.

eknath shinde 4 2 jpg webp

शिवसेनेचे कद्दावर नेते एकनाथ शिंदे आपल्या सहकारी आमदारांसह गोवहाटी येथे गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्या या बंडखोरीमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसैनिक शिंदे गटा विरुद्ध आक्रमक झाले आहेत. यातच खासदार संजय राऊत व मंत्री आदित्य ठाकरे शिंदे समर्थक आमदार विरुद्ध अर्वाच्च भाषेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करताना दिसत आहे. अशा वेळी या प्रचाराविरुद्ध एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारला आहे. तुमचे पुत्र आमच्या वंदनीय बाळासाहेबांचा शिवसैनिकांबद्दल काहीही बोलत आहेत. त्यांचा बाप काढत आहेत आणि दुसऱ्या बाजूला हिंदू विरोधी महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी तुम्ही याच आमदारांना समेटाची हाक देत आहात याचा अर्थ काय ? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरे यांना विचारला आहे

काही दिवसांपूर्वी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांची बंडखोर आमदारांविरोधात बोलताना जीभ घसरली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, गोवहाटी असलेले बंडखोर आमदार मजा करताना दिसत आहेत. मात्र ती जिवंत प्रेत आहेत. त्यांचा आत्मा मेलेला आहे. त्यांची जिवंत प्रेत आता मुंबईत येतील. मग पोस्टमॉर्टम साठी विधानसभेत पाठवाव लागेल.

तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी देखील जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सात नंतर थरथरतात अशी टीका गुलाबराव पाटलांवर केली होती. आणि माफी मागा नाहीतर पराभूत करु असे आव्हानही शिंदे यांना दिले होते. आज उद्धव ठाकरे स्वतः आमदारांना निवेदन देऊन चर्चेने मार्ग काढू असे म्हणाले आहेत. यामुळे नक्की शिवसेनेत सुरू तरी काय आहे? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला असतानाच एकनाथ शिंदे यांनी पण याच मुद्यावर बोट ठेवत नवं ट्विट केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now