जळगाव जिल्हाराजकारण

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत संजय पवार, आ. अनिल पाटलांसह आ. किशोर पाटलांच्या मुलाचा अर्ज बाद

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी सहकारी बँकेच्या निवडणुकीत छाननीच्या पहिल्याच फेरीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. दाखल झालेल्या ४०२ अर्जांपैकी तब्बल ९३ अर्ज बाद (अवैध) ठरले असून, यात बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार, आमदार अनिल पाटील आणि आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. यामुळे सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यावरील आक्षेप फेटाळल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांतून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्जांची मुदत संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून छाननी प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत ४०२ पैकी ९३ अर्ज अवैध ठरविण्यात आले. विशेष म्हणजे, जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार आणि आमदार अनिल पाटील यांचेही अर्ज बाद झाले आहेत. हे दोन्ही नेते गेल्या सलग दहा वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक होते. त्यामुळे त्यांच्या अर्जांवरील निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सुमित पाटील यांचाही अर्ज ठरला अवैध

पाचोरा तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्था मतदारसंघातून आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर सतीश परशुराम शिंदे यांनी हरकत घेतली होती. पात्रतेच्या मुद्द्यावर उपस्थित करण्यात आलेल्या या हरकतीनंतर छाननी प्रक्रियेत सुमित पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे आमदार किशोर पाटील यांच्या गोटातही या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.

रक्षा खडसेंना दिलासा; विरोधातील हरकत फेटाळली

एकीकडे दिग्गज नेत्यांचे अर्ज अवैध ठरत असताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना मात्र दिलासा मिळाला आहे. त्या जिल्हा बँकेच्या थकबाकीदार असल्याचा आक्षेप घेत त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत दाखल करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या अर्जाच्या वैधतेबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button