जळगाव जिल्हा

केमिस्ट संघटनेच्या वार्षिक सभेत ना. गिरीश महाजनांच्या हस्ते सुनील भंगाळेंचा विशेष सत्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव डिस्ट्रिक्ट मेडिसिन डीलर्स असोसिएशन (JDMDA) ची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर, महाबळ रोड, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार असून, यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सभेत अजेंड्यानुसार विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) जॉइंट कमिशनर अशोक बर्डे, सहायक आयुक्त प्रशांत असवार तसेच अँटी नार्कोटिक्स विभागाचे प्रमुख अधिकारी रिहान शेख यांचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे. या मान्यवरांचा जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वतीने सत्कारही करण्यात येणार आहे.

सभेच्या द्वितीय सत्रात राज्याचे मंत्री व जळगाव जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी नामदार गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार अमोल जावळे यांचा सत्कार व मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सुनील भंगाळे यांचा विशेष सत्कार

महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी विक्रमी मतांनी निवड झाल्याबद्दल JDMDA चे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांचा संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे.

दरम्यान, औषध विक्री व्यवसायाशी संबंधित विविध विषय, संघटनेच्या कामकाजाबाबत चर्चा तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यामुळे ही वार्षिक सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या वार्षिक सर्वसाधारण सभेला जळगाव जिल्ह्यातील सर्व केमिस्ट सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जळगाव डिस्ट्रिक्ट मेडिसिन डीलर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button