महाराष्ट्रशैक्षणिक

महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी-12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीच्या लेखी परीक्षेला ८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल. विद्यार्थी आता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले वेळापत्रक पाहू शकतील.

परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक:

इ. १२ वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षा:

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन: बुधवार, २० जानेवारी २०२७ ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७.

लेखी परीक्षा: सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ ते गुरुवार, १८ मार्च २०२७.

इ. १० वी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) परीक्षा:

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन: गुरुवार, २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७.

लेखी परीक्षा: सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ ते सोमवार, १५ मार्च २०२७.

दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा

दहावी आणि बारावीच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा महाराष्ट्रातील नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येतील. यामध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांनी तयारीला लागण्याचे आवाहन

बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना आता अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी स्पष्ट वेळापत्रक उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखा लक्षात घेऊन विषयानुसार अभ्यासाचे नियोजन करावे आणि प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचीही तयारी वेळेत पूर्ण करावी.

मंडळाने परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या अनधिकृत वेळापत्रकांवर विश्वास न ठेवता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकच अंतिम मानावे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button