अबब…कपाशीचे बनावट बियाणे विक्रीला काढले; दोघांना अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२२ । नामांकीत कंपन्यांच्या कपाशीच्या बनावट बियाण्यांची विक्री करणारे प्रदीप शामराव पाटील ( रा. चिखली, ता. मुक्ताईनगर) आणि गोपाळ वामन जवरे ( रा. जवळा बाजार, ता. नांदुरा, जि. बुलढाणा ) यांना मुक्ताईनगर येथील कृषी विभागाने पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एकूण ५६, ७०० रूपयांची बनावट बियाणे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई दि.१ रोजी करण्यात आली. दोघांवर गुन्हा दाखल

biyane

बाजारात कपाशीच्या बियाण्यांची विक्री सुरू झाली असून काही भामटे बनावट बियाण्यांची विक्री करून शेतकर्‍यांची फसवणूक करत असल्याने दरवर्षी अनेक शेतकर्‍यांना यामुळे मोठा फटका बसत असतो. सदर बाब लक्षात घेऊन यंदा कृषी खात्याने आपल्या मोहिम अधिकार्‍यांच्या माध्यमातून यावर नजर ठेवली आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके निरिक्षक तसेच मोहिम अधिकारी विजय दगू पवार यांना मुक्ताईनगरात कपाशीच्या बनावट बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी याबाबत मुक्ताईनगर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली.

गुन्हा दाखल

कपाशीच्या बनावट बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी दोघांवर रात्री उशीरा मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला. ही कारवाई मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे निरिक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक बोरकर, परवीन तडवी व पो. ना. विजय पढार यांच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories