पोलिसांच्या हातावर तुरी देत पळाला कैदी, दोन कर्मचारी निलंबित

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । भुसावळ येथील पोलिसांच्या तावडीतून आरोपी निसटल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ.प्रवीण मुंडे यांनी येथील बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांचे निलंबन केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमित राजू तडवी व ईश्वर संजय भालेराव अशी निलंबित पाेलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दरम्यान, पसार संशयिताला गुरुवारी अकोल्यातून गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

crime 2022 05 28T103834.778

येथील बाजारपेठ पाेलिस ठाण्यातील भालेराव व तडवी भुसावळ उपहारगृहात कैदी पार्टी म्हणून ड्यूटी लावण्यात आली होती. संशयित महेश शिवदास दिक्षे, रा.लोणी, ता.रीसोड, जि.वाशीम यास मोबाईल चोरीप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आल्याने दोन्ही कर्मचारी कैदी पार्टी म्हणून भुसावळ कारागृहातून जळगाव कारागृहात संशयिताला नेत हाेते. यावेळी कारागृह अधिकाऱ्यांशी कर्मचारी संवाद साधत असतानाच संशयिताने पळ काढला होता. जिल्हा पेठ पोलिस कारागृहाच्या ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी दोन्ही कर्मचाऱ्यांचा कसुरी अहवाल आल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now