भुसावळच्या आठवडे बाजारात आढळला ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । भुसावळ शहरातील आठवडे बाजारातील अमृततुल्य चहा दुकानासमोर ५५ वर्षीय प्रौढाचा मृत्यूदेह आढळला. संजू महिपत मेढे (वय ५५, रा. शिवाजी नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

crime jpg webp

शहरातील आठवडे बाजारातील भाजीपाला ओट्याजवळ अमृततुल्य चहाचे दुकान आहे. या दुकानासमोर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बुधवारी (दि.२५) रात्री ११ वाजेपूर्वी आढळला. मयूर मिलिंद जाधव (रा.खडका रोड, लाल बिल्डिंग जवळ, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यात मृतदेह संजू महिपत मेढे यांचा असल्याचे समजले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now