
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । २५ मे निमित्त संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात आदिशक्ति मुक्ताबाई यांचा सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी (७२५ वे) वर्ष अंतर्धान सोहळा साजरा केला जात आहे. प्रामुख्याने मुक्ताईनगर येथे हा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. नुकताच पालखी सोहळा देखील घेण्यात आला.महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट करत मुक्ताईंना अभिवादन केल आहे.

संतनगरी कोथळी मुक्ताईनगर येथे पंढरीश परमात्मा, रुख्मिणी माता, नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ , संत सोपान काका व लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होत आहे. सकाळपासूनच मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शन घेत आहेत. वठूमाऊलीच्या गजराने या सोहळ्याला मंत्रमुग्ध केले आहे. ज्ञानोबा माउली तुकाराम…. आदिशक्ती मुक्ताईच्या जय जय काराने परिसर मंत्रमुग्ध झाला आहे. याच अनुषंगाने तमाम मुक्ताईनगर वासियांनी सोशल मीडियावर पोस्ट आणि ट्विटचा पाऊस पडला आहे.
स्वतः महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट करत मुक्ताईंना अभिवादन केला आहे. त्यांनी मुक्ताईनगर येथील रहिवासी गणेश लाहोटी यांनी ट्विटर अकाऊंट वर ट्विट केलेली पोष्ट बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी री ट्विट (पुन्हा ट्विट) करत संत मुक्ताई यांना अभिवादन केले आहे. यावेळी त्यांनी तमाम वारकरी व भाविकांना या सोहळ्याच्या शूभेच्छा दिल्या आहेत.












