वर्षभरापूर्वी मोठ्या भावाचे निधन, लहान भावाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज | सुभाष धाडे | जिल्ह्यात आत्महत्यांची मालिका सुरूच असून दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटना समोर येत आहे. तसेच तालुक्यातील मौजे पिंप्री आकाराऊत येथील २२ वर्षिय तरुण मंगेश निवृत्ती माळी याने राहत्या घरात १८ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास गळफास घेतल्याची दुर्देवी घटना घडली. घटनेची माहीती समजताच ग्रामस्थांनी धाव घेत मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केलं.

mangesh mali

मयत मंगेश याने केलेल्या आत्महत्येचे नेमके कारण कळु शकले नाही. याबाबत मुक्ताईनगर पोलिसात मयताचे काका सुभाष महादु माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगेश याच्या पश्चात आई-वडील व भाऊ आहे. तसेच वर्षभरापुर्वी मोठ्या भाऊचे दुर्देवी निधन झाले होते. या दु:खदायक घटनेने परीसरात शोककळा पसरलीआहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories