
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । रेल्वे स्थानक व्यवस्थापकांच्या म्हणजेच स्टेशन मास्तरांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष केल्याने ऑल इंडिया स्टेशन मास्तर असाेशिएनतर्फे ३१ मे रोजी सामूहिक संपाचा निर्णय घेतला आहे. त्यात संपूर्ण भारतातील ३५ हजार स्थानक व्यवस्थापक संपावर जातील. भुसावळ विभागातील ६५० स्टेशन मास्तर संप करणार आहेत,

अाॅल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशनने रेल्वेचे खासगीकरण रोखणे, जुनी पेन्शन योजना व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वेळा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, दखल घेतली नाही. सात अाॅक्टाेंबर २०२० रोजी संपूर्ण भारतातील ३५ हजार स्थानक व्यवस्थापकांनी यासाठी आवाज उठवला. तरीही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे संघटनेने संघर्ष तीव्र करण्याचा निर्णय घेतला अाहे. परिणामी ३१ मे रोजी सामूहिक संप पुकारण्यात आला आहे. भुसावळ विभागात एकुण ६५० स्टेशन मास्तर अाहेत. हे सर्व जण सामूहिक संपात सहभागी होतील, असे असाेशिएनतर्फे मंडळ सचिव विजय झुंजेराव यांनी कळवले आहे. यापूर्वी आम्ही पहिल्या टप्प्यात एस्माच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे बाेर्डाच्या अधिकाऱ्यांना ई-मेल पाठवला. दुसऱ्या टप्यात १५ अाॅक्टाेबर २०२१ रोजी रात्र पाळीच्या स्टेशन मास्तरांनी मेणबत्ती पेटवून विरोध व्यक्त केला, तिसऱ्या टप्यात २० ते २६ ऑक्टोबर असे आठवडाभर काळ्या फिती लावून काम केले. चौथ्या टप्प्यात ३१ अाॅक्टाेबरला एक दिवस उपाशी राहून काम केले. पाचव्या टप्प्यात देशातील ३५ हजार जणांनी धरणे अांदाेलने केले होते असे सांगितले.
रात्रपाळीचा सिलिंग लिमिट ४३ हजार ६०० रूपयांचा आदेश रद्द करावा, १ जुलै २०१७ पासूनचा रिकव्हरी आदेश परत घ्यावा, स्टेशन मास्तरांच्या रिक्त जागा तत्काळ भराव्या, एमएसीपीचा लाभ १ जानेवारी २०१६ पासून द्यावा, स्टेशन मास्तरांना सेफ्टी व तणावमुक्तीसाठी भत्ता द्यावा, पदनाम परिवर्तनासाेबतच केडरचे सुद्ध वर्गीकरण करावे, रेल्वेचे खासगीकरण करणे बंद करणे, नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी योजना देणे.











