जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । येथील एस.एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या प्रा. विजेता सिंग यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय उभारणीत सामाजिक कायदेशीर योगदान’ या विषयावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबईतील राज भवनात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी झालेल्या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. या वेळी पुस्तकाचे सहलेखक डाॅ. शर्मिला घुगे, डाॅ. भावेश भराड उपस्थित होते.