जोपर्यंत चंद्र, सूर्य व तारे आहेत तोपर्यंत गडकरींच नाव घेतलं जाईल – गुलाबराव पाटील

एप्रिल 22, 2022 7:51 PM

gulabrao patil

जळगाव लाईव्ह न्यूज | २२ एप्रिल २०२२ | महाराष्ट्र दिल्लीत गेल्या की काय काय करू शकतो ? याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच नितीन गडकरी आहेत. त्यांच्या कामामुळे ते संपूर्ण देशाचे सर्वात लाडके नेते झाले आहेत. जोपर्यंत या सृष्टीमध्ये चंद्र – सूर्य – तारे आहेत तोपर्यंत नितीन गडकरी यांचे नाव या सृष्टी मध्ये घेतले जाईल असे उद्गार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नितीन गडकरी यांची स्तुती करताना काढले.

यावेळी ते म्हणाले की, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते नितीन गडकरी होते. त्यावेळेस त्यांच्या बहुमुल्य मार्गदर्शन मला माझ्या राजकारणात लाभल. गेल्या पंचवीस वर्षापासून गडकरींची यांची साथ मला माझ्या राजकारणात मिळाली आहे. याचा मला अभिमान आहे. याच बरोबर ज्याप्रकारे गडकरी साहेब विकासाचे राजकारण करतात तेच करायचा प्रयत्न मी करत आहे. असे यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now