⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

रणवीर कपूरने आपल्या साल्यांना आहेरात दिले तब्बल बारा लाख रुपये

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | २२ एप्रिल २०२२ | लग्न मध्ये बायकोच्या बहिणींना किंवा तिच्या मैत्रिणींना नवरा काहीनाकाही आहेर देतो ही संस्कृतीतील एक प्रथा आहे. यामुळे लग्नाच्या वेळी नवरीच्या मैत्रिणी भलत्याच उत्साहात असतात. असाच उत्साह आलिया भटच्या मैत्रिणी देखील दाखवला. आणि आहेर म्हणून रणवीर कपूर ने त्यांना तब्बल ‘बारा’ लाख रुपये दिले.

बडे लोक, बडी बाते, बडी शादीया आणि या बड्या लग्नांमध्ये होणारा मोठा खर्च आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे. बॉलीवूड मध्ये कोणतही लग्न झालं की त्याची चर्चा होणारच. कारण की सर्वसामान्य माणसं या सुपरस्टारला आपल्या गळ्यातल ताईत बनवतात. असंच तरुणांच्या आणि तरुणींच्या गळ्यातलं ताइट म्हणजे रणवीर कपूर आणि आलिया भट या दोघांचं लग्न नुकतंच झालं या लग्नातल्या गमतीजमती आपल्या सगळ्यांनी पाहिल्या कशाप्रकारे रणवीर नाही आपल्या बायकोला उचलून घेऊन घरात घेऊन गेला. याची चर्चा तर संपूर्ण भारतात झाली मात्र आता अजून एक नव्या चर्चेने डोकं वर काढले ते म्हणजे रणवीर कपूर ने आलिया भटचा मैत्रिणींना बारा लाख रुपये चा आहेर दिला.

बारा लाख रुपये आपल्या बायकोच्या मैत्रिणींना रणबीरने दिले आणि संपूर्ण भारतातल्या बायका आपल्या नवऱ्याकडे बारा लाख रुपये मागायला लागल्या असे देखील ट्रोल सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत.