वरणगावच्या तिष्य उबाळेची स्केटिंगमध्ये चमकदार कामगिरी

एप्रिल 19, 2022 11:00 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरीतील रहिवासी तिष्य देवानंद उबाळे (वय १३) या बालिकेने एक तासात सलग १० इव्हेंट स्केटिंगमध्ये करून जागतिक विक्रम केला आहे. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत देशभरातील ७५९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात उबाळेने जागतिक स्तरावर हा विक्रम केल्याचा दावा करण्यात आला.

ubale jpg webp

ऑल वर्ल्ड मल्टिपल इव्हेंट आर्गनायझेशनने ऑनलाइन पद्धतीने या स्केटिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात तिष्यने हे यश संपादन केले आहे. तिला जागृती काळे यांचे मार्गदर्शन लाभले. तिष्य हिने आतापर्यंत औरंगाबाद, गोवा, नागपूर, मुंबई, जळगाव, भुसावळ या ठिकाणी स्केटिंग स्पर्धा गाजवल्या आहेत. मे महिन्यात थायलंडमध्ये होणाऱ्या आर्सेक एशिया स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now