२२ वर्षीय छायाचित्रकाराची विषारी द्रव्य सेवन करुन आत्महत्या

एप्रिल 19, 2022 9:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगांव येथील छायाचित्रकार रितेश बाळु पाटील (वय २२) या तरुणाने विषारी द्रव्य सेवन करुन आपली जिवनयात्रा संपविली. मनमिळावु व दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणाऱ्या रितेशच्या या कृत्यामुळे घरकुटुंब उघड्यावर आले आहे. तसेच परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

suicide jpg webp

रितेशचे वडीलांचा आधीच मृत्यु झालेला असून भाऊचे देखील अपघातात निधन झाले आहे. पश्चात शेतमजुरी करणारी आई व दिव्यांग बहीण आहे. रितेशने टोकाचे पाऊल उचलले यामुळे कुटुंबावर दु:खाचे डोंगर पसरला आहे. आत्महत्त्येचे कारण कळु शकले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories