भाजपचे आंदोलन म्हणजे ‘वांझोट’ आंदोलन

एप्रिल 13, 2022 8:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । भारतीय जनता पक्षाने केलेले आंदोलन हे वांझोट आंदोलन होतं अशी प्रतिक्रिया मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

sunil mahajan


भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी जळगाव शहरातील नागरिकांना मनपाने वाढीव घरपट्टी विरोधात जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाने या वेळी मनपा आणि शिवसेना विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली होती.

या आंदोलनाचा शिवसेना विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला. सुनील महाजन यांनी भारतीय जनता पक्षावर तोफ डागताना सुचिता हाडा यांनी करामध्ये वाढ झाली पाहिजे ही मागणी सर्वप्रथम केली होती याची आठवण भाजपाला करून दिली याच बरोबर मनपाकडे जर स्वतः उत्पन्नाचं साधन नसेल तर शहराचा विकास करायचा कसा असाही प्रश्न महाजन यांनी विचारला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now