आय.एम.ए.जळगावच्या महिला डॉक्टर्सने केले ट्रेकिंग

एप्रिल 10, 2022 7:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । नियमित व्यायाम केल्याने शरीर सुदृढ राहते या संकल्पनेतुन आय.एम.ए. जळगाव चे सचिव डॉ.जितेंद्र कोल्हे ,अध्यक्ष डॉ.दीपक आठवले यांनी महिला डॉक्टरांसाठी मोहाडी येथील टेकडीवर रविवारी पहाटे ट्रेकिंगचे आयोजन केले.

डॉ ओमान 1 1

आय.एम.ए.स्पोर्ट विंग चे सचिव डॉ.मनीष चौधरी,अध्यक्षा डॉ.वृषाली पाटील यांनी या ट्रेक चे नियोजन केले.सूर्योदयापूर्वीच सुरू झालेल्या या ट्रेक मध्ये सुमारे ७५ महिला डॉक्टरांनी जळगाव शहरातून मोहाडी पर्यंत पायी जात आपला सहभाग नोंदविला.

मोहाडीच्या टेकडीवर गेल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी सर्वांनी सूर्यनमस्कार करीत व्यायामाचे महत्व पटवून सांगितले. दर रविवारी आरोग्य उपयोगी असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील असे आयोजकांनी सांगितले.ट्रेक नंतर लांडोरखोरी उद्यानासमोरील डॉ.कीर्ती देशमुख यांचे नियोजित फार्महाऊस वर चहा-नाश्त्याच्या कार्यक्रम डॉ.गीतांजली लाठी यांच्या मदतीने आयोजित करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now