जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । भुसावळ शहरातील गाैतम नगरातील रहिवासी उमेश रमेश तायडे (वय ४०) यांनी शनिवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच खळबळ उडालीे. येथील बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचमाना केला.

आनंदा तायडे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद झाली. हवालदार अन्वर शेख तपास करत आहे. दरम्यान, या आत्महत्येमागील कारण मात्र समोर आले नाही.













