कुऱ्हे पानाचे शिवारात आढळला अनोळखी मृतदेह

एप्रिल 9, 2022 1:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । भुसावळ-जामनेर रोडवर कुऱ्हे पानाचे शिवारात शुक्रवारी महाराष्ट्र ढाब्याजवळ एक अनोळखी अंदाजे ४० ते ४५ वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पाेलिस पाटील मनिषा बावस्कर यांनी त्याबाबत भुसावळ पाेलिस ठाण्यास कळवले.

crime jpg webp

भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्यासह सपाेनि अमोल पवार, सादीक शेख, दीपक जाधव, राहुल महाजन, युनूस शेख, गणेश गव्हाळे यांनी घटना स्थळाचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या पुरुषाच्या मृत्यूचे नेमके कारण समजले नाही. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगावला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला.

ओळख पटवण्याचे पाेलिसांचे आवाहन
या अनाेळखी पुरुषाची ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेण्याचे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now