तरुणाची आत्महत्या : शवविच्छेदन बंद : मृतदेह पोलीस स्टेशन समोर पडून

एप्रिल 9, 2022 12:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । भुसावळ येथील एका भागातील 40 वर्षीय तरुणाने आज आत्महत्या केली, मात्र शहरात शवविच्छेदन सुरू नसल्याने मृतदेह बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोर रुग्णवाहिकेत पडून आहे.

crime jpg webp

अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरांमध्ये शवविच्छेदन कक्ष हा ट्रामा केअर सेंटर आणि नगरपालिका हॉस्पिटलच्या वादांमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे. शहरातील नगरपालिका हॉस्पिटल आणि ट्रामा केअर सेंटर या दोघांच्या वादामध्ये शवविच्छेदन कक्ष हा गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे शहरात कोणतीही अनुचित घटना घडली तरी मृतदेहाला जळगाव यावल किंवा वरणगाव या ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी घेऊन जावं जावे लागत आहे. आज शहरातील गौतम नगर या भागांमध्ये उमेश तायडे (वय ४०) या युवकाने आत्महत्या केली. परंतु शहरातील शवविच्छेदन बंद असल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तायडे यांचा मृतदेह राजापेठ पोलिस स्टेशन समोर आणून ठेवला. पोलिसांच्या मध्यस्थीने या मृतदेहाची आता वरणगाव येथे शवविच्छेदन करण्यात येणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now