थरारक घटना : भरधाव ट्रक शिरला घरात, १ ठार ३ बचावले

एप्रिल 9, 2022 12:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । भुसावळ शहरातील गजानन महाराज मंदिराजवळ भरधाव वेगाने धावणारा ट्रक घरात शिरल्याची थरारक घटना घडली आहे. यात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत.

accident 15

अधिक माहिती अशी की, शहरातील यावल रोडवरून अनेकदा लहानमोठे अपघात होत असतात. दरम्यान, आज येथून भरधाव वेगाने धावणार्‍या (एमएच ४६ एएफ ५५५४) क्रमांकाच्या मिनी ट्रकने आधी दोन जणांना कट मारले. यानंतर गजानन महाराज मंदिराच्या जवळ असणार्‍या घराला धडक दिली. या घरात दोन जण होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. तर, रस्त्यावर कट मारल्याने देखील दोन जण जखमी झाले आहेत. शहरात भर दिवसा सुमारे अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. दरम्यान, ट्रकचा चालक हा मद्यधुंद होता की काय ? यबाबातच चौकशी करण्यात येत आहे. तर रस्त्याला लागून असणार्‍या झोपडीवजा घरावर हा ट्रक आदळल्याने या घराचे मोठे नुकसान देखील झाले आहे. यावल रोडवरील असुरक्षित वाहतुकीचा मुद्दा यातून पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now