⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | बातम्या | अकोला – अमरावती जाण्याचा विचार करताय? लालपरी सुरू झालीये

अकोला – अमरावती जाण्याचा विचार करताय? लालपरी सुरू झालीये

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । गेल्या कित्येक महिन्यांपासून संपावर असलेले एसटी कर्मचारी आता हळूहळू कामावर रुजू व्हायला लागले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या इशाऱ्यानंतर १ तारखेपासून ५०० पेक्षा अधिक चालक व वाहक कामावर रुजू झाले आहेत. यामुळे आता महामंडळाने फेर्‍या वाढल्या आहेत.

चालक व वाहक यांची कमतरता असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून एसटीच्या फेऱ्या हव्या तितक्या होत नव्हत्या मात्र १ एप्रिल पासून चालक व वाहक यांचा वाढलेला आकडा लक्षात घेता महामंडळाने फेऱ्या पुन्हा सुरू केल्या आहेत. म्हणूनच की काय अकोला-अमरावती मार्गावर ही बससेवा पुन्हा सुरू झाली आहे.

नागरिकांनी अकोला -मरावती मार्गावर प्रवास करताना बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाने केले आहे

author avatar
टीम जळगाव लाईव्ह