⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | बातम्या | मुक्ताईनगर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींना सुसज्ज इमारत मिळणार

मुक्ताईनगर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींना सुसज्ज इमारत मिळणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुरव्याला यश : 3.30 कोटींचा निधी

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जनसुविधा योजनेमधून अंतिम सुधारीत तरतुदीद्वारे जिल्ह्यात 124 ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी तब्बल 27 कोटी 28 लक्ष निधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार मंजूर करण्यात आला. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुरव्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघातील मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या इमारतीच्या बांधकामासाठी 3.30 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याने 15 ग्रामपंचायतींना आता हक्काच्या फर्निचरसह सुसज्ज अशी इमारत उभारली जाणार आहे.

चार लाख 35 हजारांची रोकड घेवून भुसावळातून चालक रफुचक्कर एका ग्रामपंचायतीसाठी 22 लाखांचा निधी मंजूर एका ग्रामपंचायतीसाठी 22 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी नुकतीच जिल्ह्यातील 124 ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता दिली होती तर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यासाठी 90 टक्के निधी म्हणजे 23 कोटी 56 लक्ष निधी जिल्हा परीषदेकडे वितरीत केला होता. लवकरच 124 ग्रामपंचायतीच्या इमारती सुसज्ज होणार असून कार्यन्वित होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालय गावाच्या सर्वांगीण उन्नतीकरीता दिशादर्शक ठरावे, अशी अपेक्षा ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचा आदर्श पॅटर्न ग्रामपंचायत हा कोणत्याही गावाचा प्रशासकीय आत्मा असतो. बर्‍याचशा ग्रामपंचायतीच्या वास्तू या जुन्या झाल्या असून काही तर अगदी मोडकळीस आलेल्या आहेत. नेमकी याच समस्येबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा केल्याने याची दखल घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी फर्निचरसह ग्रामपंचायत कार्यालय उभारण्याचा पॅटर्न अंमलात आणला आहे. याच कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून आता जिल्ह्यातील तब्बल 124 गावांना फर्निचरसह ग्रामपंचायत कार्यालय मिळणार आहे. या कामांसाठी तब्बल तब्बल 27 कोटी 28 लक्ष रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. तत्काळ 23 कोटी 56 लाखांचा निधी जिल्हा परीषदेला वितरीत केल्यामुळे ही कामे लवकरच सुरू होणार आहेत.

असे असेल प्रत्येक नवीन ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत कार्यालयातूनच गावाचा कारभार पाहिला जातो. या पार्श्वभूमीवर, नव्याने बांधण्यात येणार्‍या ग्रामपंचायतीत सुसज्ज सुविधा प्रदान करण्यात येतील. यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांना बसण्यासाठी कार्यालय करण्यात येईल. या सोबत ग्रामपंचायतीच्या विविध बैठकींसाठी सभागृहाची तरतूद देखील असेल तर याला लागूनच प्रसाधन गृह देखील उभारण्यात येणार आहे. परीणामी गाव कारभार्‍याची व ग्रामस्थांची नवीन ग्रामपंचायत कार्यालयामुळे चांगलीच सोय होणार आहे. तालुकानिहाय अश्या मंजूर ग्रामपंचायत कार्यालय असे बोदवड तालुका- भानखेडा, मानमोडी व हिंगोणे, मुक्ताईनगर तालुका- धामणगाव, काकोडा, इच्छापूर, निमखेडी व चारठाणा, रावेर तालुका- कोचुर बुद्रुक, वाघाडी, धामोडी, उदळी बुद्रुक, आंदलवाडी, रणगाव व रायपूर या 15 गावांना नवीन ग्रामपंचायत कार्यालये मिळणार आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह