नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सज्ज : आमदार चंद्रकांत पाटील

एप्रिल 4, 2022 2:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । रावेर तालुक्यातील खिर्डी येथे शिवसेनेचा नुकताच जाहीर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे होते. यावेळी खिर्डीसह परिसरातील ६० ते ७० युवक व जेष्ठांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केले.

shivsena jpg webp

मुक्ताईनगर मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत तसेच विरोधक असो किंवा समर्थक आमचा विकसाचा ध्येय व्यक्तिगत असून सर्वांगीण आहे. व आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेवून चालणारे आहे. असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते छोटू पाटील यांनी केले. या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख योगीराज पाटील, निळकंठ पाटील, घनश्याम पाटील, भास्कर पाटील, विनोद पाटील, खिर्डी खुर्द सरपंच राहुल फालक, मोतीराम महाजन, प्रभाकर महाजन, अमोल पाटील, सुपडू बेग, हाजी महेबूब बेग, शेख जाबीर, याकूब बेग, शब्बीर शेख, मुक्ताईनगर येथील जफर भाई, आरिफ आजाद, युनूस भाई, शकील भाई, शेख कय्युम, तुषार कचरे, राहुल कोळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पारपाडण्यासाठी खिर्डी येथील जेष्ठ कार्यकर्ते जाकीर पिंजारी (बेवन सेठ), शेख सलमान, साबीर बेग, अलताब बेग आदींनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now