सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

सप्टेंबर 12, 2026 7:30 PM

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सावदा येथील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथे भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष असून महोत्सवात सहभागी होण्यासाठी १८ सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करण्याची मुदत आहे.

bulabai

भुलाबाई महोत्सवात सहभागी होण्यासाठी तीन गट आहे. पहिला लहान गट 3 ते 10 वर्षे, मोठा गट 11 ते 16 आणि तिसरा खुला गट 17 वर्षांपासून पुढील मुली, महिलांना सहभाग घेतला येणार आहे. यात स्पर्धेकांना स्वतःच गायन, वादन, टिपऱ्यांवर नृत्य करायचे आहे, या सादरीकरणासाठी 5 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. 27 रोजी सकाळी 9 वाजता स्पर्धेसाठी प्रारंभ होणार आहे.

तत्पूर्वी 18 सप्टेंबर पर्यंत 9960577698 या क्रमांकावर किंवा सावदा येथील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथे संपर्क साधून नोंदणी करणे गरजेचे आहे. या महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी गौरी जोशी यांच्याशी ९९६०५७७६९८ या क्रमांकावर संपर्क साधावा. या महोत्सवात शाळा, महाविद्यालय, महिला मंडळ, भजनी मंडळानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now